तायक्वाँडो चँम्पियनशिप स्पर्धेला अकोल्यात सुरुवात

November 15, 2008 3:02 PM0 commentsViews: 7

15 नोव्हेंबर अकोलाराज्यस्तरिय तायक्वाँडो सब ज्युनिअर चँम्पियनशिप स्पर्धेला अकोल्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नागपूरच्या दिशा तनकने विजयी सलामी दिली. अकोल्यातील वसंत देसाई इनडोअर स्टेडियममधे ही स्पर्धा सुरू आहे. राज्यभरातून या स्पर्धेत 700 हून अधिक तायक्वाँडो खेळाडू सहभागी झाले आहेत. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक विनय कुमार चौबे यांनी स्पर्धेचं उदघाटन केले. उद्घाटनाप्रसंगी स्थानिक प्रभात किडस शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना आणि लेझीम नृत्य सादर केली. सांगलीची श्रद्दा कोल आणि नागपूरची दिशा तनक याच्यात सलामी लढत झाली. या लढतीत दिशा तनकने बाजी मारली. या स्पर्धेतील विजेते खेळाडू लखनऊ येथे होणा-या राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.

close