मागे हटणार नाही – अण्णा

August 24, 2011 7:27 AM0 commentsViews: 2

24 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. कालपर्यंत अण्णांचे वजन पाच किलो 60 ग्रॅमने कमी झालं होतं आज अण्णांचं वजन आणखी 200 ग्रॅमनं कमी झालंय. काही वेळापूर्वीच जाहीर झालेल्या अण्णांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. काल पंतप्रधानांनी पत्र पाठवून अण्णांना उपोषण सोडण्याचं आवाहनं केलं होतं. आजही पंतप्रधानांनी अण्णांना आवाहन केलं की अण्णांनी ग्लुकोज घ्यावं. पण अण्णा मात्र उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. अण्णांची तब्येत आता खालावत चाललीय. त्यामुळे डॉक्टरांनी अण्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. पण अण्णांनी हॉस्पिटलमध्ये जायला स्पष्ट नकार दिला आहे. देशासाठी प्राण द्यावे लागले तरी हरकत नाही. पण जनलोकपालच्या ध्येयापासून मागे हटणार नाही. मी गेलो तर या देशात हजारो अण्णा निर्माण होतील असंही अण्णा म्हणाले. सरकार आणि टीम अण्णांमध्ये कालपासून थेट संवाद सुरु झाला. पण रामलीला मैदानावरचा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला. गेल्या आठ दिवसांपेक्षा आज सकाळपासून हा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. दिल्लीत काल रात्री जोरदार पाऊस झाला आणि रामलीला मैदानावर चिखल झाला आहे.

close