अरुणा रॉय, वरुण गांधी यांनी घेतली अण्णांची भेट

August 24, 2011 7:42 AM0 commentsViews: 3

24 ऑगस्ट

लोकपालचा तिसरा ड्राफ्ट तयार करणार्‍या, आणि राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्य अरुणा रॉय यांनी आज अण्णांची भेट घेतली. अरुणा रॉय आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लोकपालचा तिसरा ड्राफ्ट तयार केला. अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करायला आल्याचे त्या म्हणाल्या. तसेच भाजपचे युवा नेते वरूण गांधी हेदेखील आज रामलीला मैदानावर पोहचले. तिथे जाऊन त्यांनी अण्णा समर्थकांची भेट घेतली. तसेच काही वेळ ते समर्थकांमध्ये बसले. आपला अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वरूण गांधी यांनी स्पष्ट केलं.

close