अण्णा देशाला तुमची गरज आहे, उपोषण सोडा – शिवसेनाप्रमुख

August 24, 2011 1:14 PM0 commentsViews: 8

24 ऑगस्ट

बाळासाहेब ठाकरे यांनी आज अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांचा संदेश घेऊन आज खासदार संजय राऊत अण्णांना भेटायला गेले. देशाला तुमची गरज आहे. असा संदेश बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांना दिला.

बाळासाहेब ठाकरेंच अण्णांना पत्र

अण्णा देशाला तुमची गरज आहे. तुम्ही भ्रष्टाचाराच्याविरोधात प्राण पणाला लावले, पण ही लढाई आपल्या प्राणावर बेतू नये. आपल्या उपोषणाने देश जागा झाला, त्यामुळे आपल्या ढासळत्या प्रकृतीकडे पाहून उपोषण सोडा. उपोषण सोडलं तरी आंदोलन सुरू राहील. आपले सहकारी केजरीवाल, बेदी, मनिष सिसोदिया वगैरे मंडळींना उपोषणाला बसू द्या व आंदोलन चालू राहू द्या. आम्ही आपणास महाराष्ट्राच्यावतीनं विनंती करतो की, आपण उपोषण थांबवावे, मात्र लढा सुरुच ठेवावा या लढ्यात आम्हीही आपल्यासोबत आहोत. आपल्या आंदोलनाचा व या लढ्याचा राजकीय फायदा-तोटा काय हे हिशेब आम्ही करत नाही व तो आमचा स्वभाव नाही पुढील लढाईसाठी आपले प्राण महत्वाचे आहेत आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना..! – बाळासाहेब ठाकरे

close