अण्णांनी उपोषण सोडावे – पंतप्रधान

August 25, 2011 9:33 AM0 commentsViews: 3

25 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत निवेदन केलं. अण्णांच्या आदर्शवादाबद्दल आपल्याला मोठा आदर आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी अण्णाना उपोषण मागे घेण्याबाबत भावनिक आवाहन केलं. अण्णांचं जीवन खूपच मौल्यवान आहे त्यामुळे उपोषण सोडावे असं पंतप्रधान म्हणाले. त्याचबरोबर स्थायी समितीकडे पाठवण्यापूर्वी जनलोकपाल विधेयकावर संसदेत चर्चा करण्याची तयारी त्यांनी दाखवली. पदाचा गैरवापर करून होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, हे पंतप्रधानांनी मान्य केले.

close