अण्णांना पाठिंबा : टांगा, डंपरमालकांचा मोर्चा

August 25, 2011 10:15 AM0 commentsViews: 3

25 ऑगस्ट

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला सर्वच थरातून पाठिंबा मिळतोय.अण्णांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर शहरातील टांगेवाल्यांनी टांगा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शंभरहून अधिक टांगे सहभागी झाले होते. अण्णाच्या भूमिकेला विरोध करणार्‍या सरकार आणि कपिल सिब्बल, मनिष तिवारी, पी. चिदंबरम, अंबिका सोनी या काँग्रेस नेत्यांचे फोटो घोड्याच्या तोंडावर चिटकावून त्यांच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला.

तर अण्णांना पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरात डंपरमालक रस्त्यावर उतरले. त्यांनी कोल्हापुरातील तावडे हॉटेलपासुन दसरा चौकपर्यंत डंपर मोर्चा काढला. केंद्र सरकारने तत्काळ जनलोकपाल मंजूर करावे आणि देशातल्या नागरिकांना दिलासा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

close