मनिष तिवारींनी मागितली अण्णांची माफी

August 25, 2011 3:42 PM0 commentsViews:

25 ऑगस्ट

'लोकशाहीच्या मार्गाने उपोषण करणार असं म्हणणारे अण्णा हजारे तळपायापासुन ते मस्तकापर्यंत भ्रष्टाचाराने बुडालेले आहे' असं वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी माफी मागितली आहे. त्याचं बरोबर अण्णांनी आपलं उपोषण सोडावे अशी विनंतीही अण्णांनी केली आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत निवदेन सादर केलं. अण्णांच्या आदर्शवादाबद्दल आपल्याला मोठा आदर आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी अण्णाना उपोषण मागे घेण्याबाबत भावनिक आवाहन केलं. यानंतर मनिष तिवारी यांनी संसदेच्याबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अण्णांचे आंदोलन हे खूप मोठे आहे. एखाद्या मोठ्या आंदोलनावर भाष्य करताना कधीकधी चुका होऊ शकतात. अण्णा हजारे यांच्यावर मी टीका केली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि अण्णांची माफी मागतो. तसेच अण्णांचे गेल्या दहा दिवसांपासुन उपोषण सुरू आहे ते अण्णांनी सोडावे अशी विनंती ही मी अण्णांना करतो.

close