भंडा-यात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन

November 15, 2008 3:06 PM0 commentsViews: 4

15 नोव्हेंबर भंडारामनोहरलाल पटेल अ‍ॅकॅडमीच्यावतीनं भंडारा जिल्ह्यांत भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं स्पर्धेचं उद्घाटन केलं. या स्पर्धेचं झहिर खान,आर.पी.सिंग हे खेळाडूही यावेळी उपस्थित होते. पण त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचं योग्य नियोजन नव्हतं. चाहत्यांनी केलेल्या गर्दीचा फटका या कार्यक्रमाला बसला. त्यामुळं या स्टार खेळाडूंना मैदानातून पलायन करावं लागलं. या मैदानातील सुरक्षा कर्मचा-यांनी मीडियाशीही धक्काबुक्की केली. खुर्च्यांची तोडफोडही झाली. नियोजनाच्या अभावामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यामुळे स्पर्धेच्या आयोजिका वर्षा पटेल यांच्या वतीनं अखेर केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना माफी मागावी लागली. ही स्पर्धा दोन महिने चालणार आहे, यात एकूण तीस जिल्ह्यात 1200 मॅचेस होणार आहेत.

close