पंतप्रधानांकडे मागण्या पाठवल्यात – अण्णा

August 25, 2011 10:49 AM0 commentsViews: 7

25 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी सरकार आणि टीम अण्णामध्ये चर्चेची रस्सीखेच अंतिम टप्प्यावर येऊन पोचली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जनलोकपालच्या सर्व मुद्यांवर संसदेत चर्चेची तयारी दाखवली आहे. यानंतर टीम अण्णांच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपली. पंतप्रधानांच्या आवाहनावर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी रामलीला मैदानावर जाऊन अण्णांची भेट घेतली. पंतप्रधानांचा निरोप विलासरावांनी अण्णांकडे पोचवला. अण्णांनी त्यांच्याकडून पंतप्रधानांकडे निरोप पाठवला आहे. पंतप्रधानांकडून उत्तर आल्यावर अण्णा आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी सध्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील काही लोक आपल्याला भेटले. आपण अण्णांना भेटावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे अण्णांची भेट घेतली असं विलासरावांनी सांगितले. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केल्याचंही विलासरावांनी सांगितले.

close