अण्णांना टोकियोतून पाठिंबा

August 25, 2011 12:03 PM0 commentsViews: 1

25 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनही प्रतिसाद मिळत आहे. टोकियोमध्येही अण्णांचे शेकडो समर्थक आहेत. टोकियोमध्ये अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. टोकियोमध्ये आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहिमही चालवण्यात आली. शिवाय अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं आतापर्यंत टोकियो आणि आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या भारतीयांकडून जवळपास 600 सह्या गोळा करण्यात आल्या आहेत.अण्णा हजारेंच्या जनलोकपाल विधेयकाची अंमलबजावणी व्हावी अशी विनंतीही ह्या पत्रात करण्यात आली आहे.

close