शरद पवार यांच्या घरासमोर अण्णांच्या समर्थकांची निदर्शन

August 25, 2011 5:02 PM0 commentsViews: 3

25 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाच्या आजचा दहावा दिवस आहे. एकीकडे सरकारशी वाटाघाटी सुरू आहे तर दुसरीकडे अण्णांच्या समर्थकांचे खासदार मंत्र्यांच्या घरांसमोर निदर्शन चालूच आहे. आज बारामतीमध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या घरासमोर अण्णांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. आपण निवडणू दिले खासदार हे आपले सेवक आहे. त्यांच्या घरासमोर निदर्शन करा त्यांना घेराव घाला आणि त्यांना विचारा जनलोकपाल विधेयकाला आपला पाठिंबा आहे का ? असं आवाहन अण्णांनी समर्थकांना केलं होतं. याचे पडसाद देशभरात उमटले. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत समर्थकांनी खासदारांच्या घरासमोर निदर्शन केली. नाशिकमध्ये समीर भुजबळ, नांदेडचे खासदार भास्कर खतगावकर तर काल शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या घरासमोर इंडिया अगेन्सटच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती.

close