मुंबईत पैशाने भरलेला टेम्पो ताब्यात

August 26, 2011 6:02 PM0 commentsViews: 1

26 ऑगस्ट

मुंबईतील ग्रँटरोड भागात महापालिकेच्या शाळेच्या परिसरात पैशाने भरलेला मिनी टेम्पो सापडला आहे. या टेम्पोमध्ये लाखोंने पैसे भरलेले खोके आढळून आले आहे. या टेम्पोत आतापर्यंत 50 लाख रोख आणि सोन्याचे 25 हार सापडले आहे. पोलिसांनी टेम्पो आणि पैसे ताब्यात घेतले आहेत. पण टेम्पो ड्रायव्हर फरार झाला आहे.

आज दुपारी एक वाजेपासुन हा ट्रक महापालिकेच्या शाळेत उभा होता. आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींनी महापालिकेचे अधिकारी सुरेश तावडे यांना विचारले असता काहीही सांगण्यास नकार दिला. अखेर रात्री 10: 30 च्या सुमारास पोलिसांनी पाचरण केले असता टेम्पो उघडण्यात आला.या टेम्पोमधून पैशांची बंडल आढळून आली. हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा सापडल्यामुळे ग्रँडरोड परिसरात एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे नेते राजेश शेके यांनी या टेम्पोमध्ये पैसे भरत असताना पाहिले होते यानंतर त्यांनी या टॅम्पोचा पाठलाग केला. दुपारी एकच्या सुमारास हा टेम्पो महापालिकेच्या शाळेसमोर येऊन थांबला. संध्याकाळी झाली तरी टेम्पो उभाच होता यानंतर अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला असता प्रकार उघडकीस आला.

close