मंदीच्या उपाययोजनेसाठी जी-20 राष्ट्रांची बैठक

November 15, 2008 3:55 PM0 commentsViews: 4

15 नोव्हेंबरजगातल्या काही महत्वाच्या देशांना सध्या चांगलीच आर्थिक झळ जाणवत आहे. याचसंदर्भात जी-20 राष्ट्रांची बैठक सुरू होत आहे. या चर्चेच्या अगोदर जॉर्ज डब्ल्यु बुश यांनी सर्व देशांच्या नेत्यांना भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी चिदंबरम, योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंह या बैठकीत सहभागी होणार आहेत. मंदीच्या दिवसांमध्ये जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडानं भारतासारख्या देशांना मदत करावी अशी मागणी भारतानं केलीय. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर मंदीचं संकट गहीरं होत चाललंय, यामुळे आजची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. वॉशिंग्टनच्या बैठकीत जाण्याआधी अर्थमंत्री पी चिदंबरम पत्रकारांशी बोलले. विकसित देशांनी फक्त त्यांचा स्वार्थ पाहू नये असा सल्ला त्यांनी दिला. मंदीच्या संकटाचा विकसित देशांनी गैरफायदा घेऊ नये असंही ते म्हणाले.

close