‘अब की बारी साफ सत्ताधारी’ – आदित्य ठाकरे

August 26, 2011 9:24 AM0 commentsViews: 12

26 ऑगस्ट

'अब की बारी साफ सत्ताधारी' अशी घोषणा देत शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी अण्णांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे असं स्पष्ट केलं. अण्णांची भेट घ्यायला आज आदित्य ठाकरे रामलीला मैदानावर पोहचले आहेत. अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. तसेच अण्णांनी उपोषण सोडावे अशी विनंतीही पुन्हा शिवसेने तर्फे केली. अण्णांनीही शिवसेनाप्रमुखांच्या या भूमिकेवर आभार व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांनी उपोषण मागे घ्यावे असं पत्र लिहले होते. तसेच तर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मेधा पाटकर यांच्यामार्फत अण्णांची चौकशी केली.

close