अण्णांचे उपोषण लांबले ; संसदेत चर्चा न होण्याची शक्यता

August 26, 2011 9:41 AM0 commentsViews: 3

26 ऑगस्ट

जनलोकपालावर संसदेत आज चर्चा होणं शक्य नसल्याने आता अण्णांचे उपोषण आणखी लांबले आहे. जनलोकपालासह लोकपालाच्या आणखी 3 मसुद्यांवर उद्या चर्चा होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल यांनी म्हटलं आहे. संसदेत सक्षम लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे अण्णांनी याआधीच स्पष्ट केल्याने त्यांचे उपोषण आता आणखी लांबणीवर गेले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत आजच चर्चा करा अशी मागणी अण्णांच्या सहकार्‍यांनी केली आहे.

close