समर्थकांच्या पाठिंब्याने वाढली उर्जा – अण्णा हजारे

August 27, 2011 9:21 AM0 commentsViews: 5

12 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आज 12 दिवस आहे. एकीकडे डॉक्टर अण्णांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे अण्णा स्टेजवर येऊन समर्थकांशी संवाद साधतात. अण्णा म्हणाले की, मला कोणत्याही प्रकारची थकावट आली नाही मी अजून चार दिवस उपोषण करू शकतो असं सांगितले. अण्णांचे 16 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे. दिवसेंदिवस लोकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे हा माझ्यासाठी नवं चैतन्य आहे असं ही अण्णा म्हणाले. तसेच प्रसारमाध्यम, वृत्तपत्रातून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. यावेळी भगवत गितेतल्या 'यदा यदा ही धर्मस्य' ओळीची अण्णांनी आठवण करून दिली. अण्णांचे बाराव्यादिवशी सात किलोंनी वजन घटले आहे.

close