सुरक्षा यंत्रणा तोडून अण्णा समर्थक संसद परिसरात घुसला

August 26, 2011 11:19 AM0 commentsViews: 1

26 ऑगस्ट

संसद परिसरात घोषणाबाजी करून सुरक्षा व्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अण्णा हजारेंचा समर्थक असल्याचा दावा त्याने केला. मनजित सिंग असं त्याचं नाव आहे. तो हरयाणातल्या रोहतकचा रहिवासी आहे. त्याच्याकडे व्हिजिटर्स गॅलरीचा पास सापडला आहे. खासदार अनंतराम रेड्डी यांच्या पीएनी त्याला पास दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनजित सिंगला कोठडीत टाका, असं मत कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे यांनी व्यक्त केले.

close