अखेर सरकार ठराव मांडणार

August 27, 2011 2:10 PM0 commentsViews:

27 ऑगस्ट

अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या तीन प्रमुख मागण्यावर चर्चेनंतर अखेर सरकारने ठराव मांडणार आहे. तसेच यावर आवाज प्रक्रियेव्दारे मतदान घेतले जाणार आहे. यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांनी होकार दर्शवला आहे. आज रात्री आठच्या सुमारास लोकसभा आणि राज्यसभेत ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. यानंतर ठरावाची पत्र विलासराव देशमुख अण्णा हजारे यांच्याकडे घेऊन जातील. यानंतर गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेले अण्णा आपलं उपोषण सोडतील.

सरकारने चालवलेल्या रस्सीखेच आज पूर्ण विराम मिळणार आणि आज ऐतिहासिक निर्णय दिला जाणार याकडे सर्वजण वाट पाहून आहे. मात्र दुपारी काही सरकारने वेगळाच सुर लावला. आज लोकसभेत कलम 193 नुसार चर्चा होत आहे. या चर्चेनंतर मतदान घेतले जाणार नाही तसेच या चर्चेचा सार अण्णांना सांगितला जाईल. लोकपालवर भाजपची मतदान करण्याची सरकारची तयारी नाही असे कारण सरकारने पुढे केले आहे. यावर प्रशांत भूषण यांनी केवळ चर्चेनं काही होणार काल आम्हाला सरकारने आश्वासन दिले आहे. जर सरकार आपल्या भूमिकेवर ठाम नसेल तर हे सगळ्यात मोठं दुर्देव आहे. तर केजरीवाल म्हणाले की, सरकारने आमची आतापर्यंत 4 वेळा फसवणूक केली आहे. आता सरकारवर कोणताही विश्वास राहीला नाही.

close