82 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन महाबळेश्वरला

November 15, 2008 3:57 PM0 commentsViews: 17

15 नोव्हेंबर राम जगतापसॅनहोजेला फेब्रुवारी महिन्यात होणा-या विश्व साहित्य संमेलनाचा मार्ग नुकताच मोकळा झाला. त्यामुळे आता महामंडळानं 82 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन महाबळेश्वरला भरवण्याची तयारी चालवली आहे. सॅनहोजेला विश्व साहित्य संमेलन होत असल्यानं या वर्षी अखिल भारतीय संमेलन होणार नाही असं महामंडळानं आधी जाहीर केलं होतं. पण पुणे आणि महाबळेश्वर या ठिकाणाहून संमेलनासाठी निमंत्रणं आली. महाबळेश्वरला संमेलन घेण्याची तयारी खुद्द केंद्रीय संसदीय राज्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांनी दाखवली होती. त्यामुळे महामंडळही जागे झालं. तेव्हा महामंडळानं काल दोन्ही ठिकाणाची पाहणी करून आज महाबळेश्वरची निवड केली आहे. हे संमेलन मार्च महिन्यात होणार असून अध्यक्षाची निवड 16 जानेवारीला होणार आहे.

close