अण्णा उपोषण उद्या सोडणार !

August 27, 2011 3:56 PM0 commentsViews: 2

27 ऑगस्ट

अण्णांचे जनलोकपाल विधेयकासाठी गेल्या 12 दिवसांपासून करून अखेर आज अण्णांच्या लढाईचा ऐतिहासिक विजय झाला. हा जनशक्तीचा विजय आहे, देशवासीयांचा, तरूणांचा हा विजय आहे. या आंदोलनात अखंड देशवासीयांनी पाठराखन केली हा त्यांचा विजय आहे. या लढ्यात नागरी समितींच्या सदस्यांचा हा विजय आहे आणि या विजयात सिंहाचा वाटा हा मीडियाचा आहे असे विजयोद्गार अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर काढले. मात्रही लढाई अर्धी जिंकली आहे पूर्ण लढाई अजून बाकी आहे. आपण उद्या सकाळी 10 वाजता उपोषण सोडत आहोत असं ही अण्णांनी जाहीर केले.

close