रामलीला मैदान घोषणांनी दणाणले

August 28, 2011 7:01 AM0 commentsViews: 1

28 ऑगस्ट

अण्णा हजारे उपोषण सोडणार हे जाहीर करताच रामलीला मैदानावर एकच जल्लोष झाला. 'इन्कालाब जिंदाबाद', 'अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है','वंदे मातरम्' च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. जनतेचं म्हणणं ऐकत सरकारने भ्रष्टाचार मिटवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याचा आनंद तर लोकांना होताच. पण लोकप्रतिनिधींनी मनात आणलं तर एखाद्या विषयावर संसदेत चांगली आणि परिणामकारक चर्चा होऊ शकते, याचासुद्धा आनंद लोकांमध्ये होता. देशभरील लोक अण्णांना पाठिंबा देण्यासाठी रामलीला मैदानावर गेल्या 13 दिवसांपासून जमले होते. यामध्ये तरूणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

close