मुंबईत 17 अण्णा समर्थकांनी उपोषण सोडले

August 28, 2011 7:11 AM0 commentsViews: 6

28 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशविदेशातून लोकांनी पाठिंबा दिला. भ्रष्टाचाराच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. आज सकाळी 10 :30 च्या सुमारास अण्णांनी उपोषण सोडले. अण्णांच्या सोबत अनेक जणही उपोषणाला बसले होते. त्यापैकी मुंबईतूनही 17 जण उपोषणाला बसले होते. आझाद मैदानातच त्यांनी हे उपोषण केले. सर्व वयोगटातील हे स्त्री पुरुष या उपोषणात सहभागी झाले होते. अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर अण्णा समर्थकांनी उपोषण सोडून अण्णांचा जयजयकार केला.

close