गगन नारंगला खेलरत्न पुरस्कार प्रदान

August 29, 2011 1:33 PM0 commentsViews: 6

29 ऑगस्ट

क्रीडा क्षेत्रातल्या मानाच्या खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचे वितरण आज सकाळी राष्ट्रपती भवनात झाले. नेमबाज गगन नारंगला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्यावर्षी भारतात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत त्याने चार गोल्ड मेडलची कमाई केली होती. कॉमनवेल्थमध्ये ऍथलेटिक्स प्रकारात गोल्ड जिंकणार्‍या प्रीजा श्रीधरनला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रीजाबरोबरच क्रिकेटर झहीर खान, बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा , नेमबाज तेजस्विनी सावंत यांनाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला.

close