ठाणे-पनवेल बॉम्बस्फोट प्रकरणी 2 दोषी, 4 निर्दोष

August 29, 2011 11:49 AM0 commentsViews: 1

29 ऑगस्ट

ठाणे आणि पनवेलमध्ये तीन वर्षापूर्वी झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती यापैकी विक्रम भावे आणि रमेश गडकरी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. आज मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय सुनावला आहे. इतर चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मंगेश निकम, संतोष आंग्रे, हेमंत चाळके आणि हरिभाऊ दिवेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेल मधील एका थिएटर मध्ये हे स्फोट झाले होते. तर वाशीतील विष्णुदास भावे सभागृहासमोर जिवंत बॉम्ब सापडला होता.

close