विजयाची गुढी उभारून राळेगणमध्ये आंनदोत्सव साजरा

August 28, 2011 9:22 AM0 commentsViews: 2

28 ऑगस्ट

रामलीला मैदानात अण्णा हजारे यांनी सिमरन आणि इक्रा या दोन चिमरुड्या मुलींच्या हातून नारळ पाणी पिऊन उपोषण सोडताच राळेगणमध्ये गावकर्‍यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. सकळापासूनच सडे-रांगोळ्या घालून आणि विजयाची गुढी उभारून आनंदोत्सवाला सुरुवात झाली होती. त्यानंतर यादवबाबा मंदिरापाशी जमलेल्या गावकर्‍यांनी मग आनंदान नाचत गातं, अगदी डीजेच्या तालावर हा क्षण साजरा केला. फुगड्या, झिम्मा खेळत महिलांनीही या उत्सवात सहभाग घेतला. राळेगणेमध्ये आज जणू दसरा-दिवाळीच साजरी करण्यात आली.

close