पश्चिम महाराष्ट्रातील धरणं तुडूंब

August 29, 2011 11:58 AM0 commentsViews: 5

29 ऑगस्ट

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 8 हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

राजाराम बंधार्‍याची पाण्याची पातळी 30 फुटावर जाऊन पोहोचली आहेत. जिल्ह्यातील भोगवती, कुंभी, तुळशी नद्यांचे पाणीही पात्राबाहेर पडले आहे. तर – सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 11 फूटाने उघडले असून धरणातून 95 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

धरण क्षेत्रातील संततधार सुरु असल्याने विसर्ग वाढू शकतो. कराड, पाटन आणि सांगली शहराला पुराचा धोका असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. तर पुण्यातीलं खडकवासला धरण सुध्दा पूर्ण भरले आहे. या धरणातून सध्या 40 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात येतं आहे.

close