..आणि अण्णा समर्थकांनी हंडी फोडली

August 28, 2011 11:10 AM0 commentsViews: 8

28 ऑगस्ट

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडल्यावरच मुलंूडच्या श्री संतोषी माता सांस्कृतिक कला मित्र मंडळाने दहीहंडी फोडण्याचा निर्धार केला होता. अण्णांनी आज उपोषण सोडल्यावर मुलूंडमध्ये दहीहंडी उत्साहात फोडण्यात आली. अण्णांच्या उपोषणाला नागरिक आपापल्या पद्धतीने पाठिंबा देत होते. आंदोलनाच्या वेगवेगळ्या कल्पना लढवलेल्या जात होत्या. गेली 52 वर्ष हे मंडळ दहीहंडी उत्सव साजरा करत आहे. पण यंदा अण्णांच्या समर्थनासाठी त्यांनी गोकुळाष्टमीला दहीहंडी न फोडता अण्णांनी उपोषण सोडल्यावरच दहीहंडी फोडायचं ठरवलं होतं.

close