शंकर महादेवनचा ‘गणराज अधिराज’अल्बम लाँच

August 28, 2011 1:05 PM0 commentsViews: 8

28 ऑगस्ट

गणेशोत्सावानिमित्त इएमआय म्युझिक कंपनीने गणराज अधिराज हा नवीन म्युझिक अल्बम लाँच केला आहे. या अल्बमचं वैशिष्ठय म्हणजे शंकर महादेवन आणि त्याची दोन मुलं सिध्दार्थ आणि शिवम यांनी सुध्दा या अल्बममध्ये गाणी गायली आहे. नुकतंच या अल्बमचं लाँच मुंबईत करण्यात आलं. यावेळी गायक संगीतकार शंकर महादेवन, एहसान ,लॉय , संगीतकार सलीम सुलेमान उपस्थित होते. गणराज अधिराज या अल्बमचं संगीत गुलराज सिंह यांनी केलं असून या अल्बममधील गाणी मनोज यादव यांनी लिहीली आहेत. यावेळी शंकर महादेवन आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी या अल्बममधील काही गाणी रसिकांसमोर सादर केली. संगीतकार आणि गायक सलीम यानेही या अल्बममधील एका गाण्याला संगीत दिले आहे.

close