ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून सुरु

August 29, 2011 12:12 PM0 commentsViews: 4

29 ऑगस्ट

वर्षातली शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा युएस ओपन टेनिस स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. आयरिन वादळाचा धोकाही आता टळला आहे. त्यामुळे आज स्पर्धा वेळेवर सुरु होणार आहे. पुरुषांमध्ये तिसरा सिडेड आणि गतविजेता रॉजर फेडरर आजच आपली मिशन सुरु करतोय. तर व्हिनस विल्यम्स आणि मारिया शारपोव्हाही आपली पहिली राऊंड आज खेळतील. नोवान जॉकोविचला अव्वल सिडिंग मिळाले आहे. पण तो सध्या दुखापतीने त्रस्त आहे. तर नदाललाही मनगटाच्या दुखापतीने सातवलंय. फेडररने मागच्या वर्षभरात एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे स्पर्धेला यंदा नवा विजेता मिळतो का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

close