मारबत-बडग्यांच्या मिरवणुकीत भ्रष्टाचाराला विरोध

August 29, 2011 12:22 PM0 commentsViews: 31

29 ऑगस्टनागपूरकरांसाठी पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजेच तान्हा पोळ्याचा दिवस महत्वाचा असतो. शहरात मारबत आणि बडग्यांची धूम असते. हजारो लोक रस्त्यावर येतात आणि मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबत गेल्या 125 वर्षापासून काढली जाते आणि दर वर्षी चर्चेत असलेल्या विषयावर बडग्या काढला जातो. पिवळ्या मारबतीची पूजा केली जाते आणि समाजातील वाईट गोष्टी घेऊन जाण्याची विनंती यावेळी मारबतीला केली जाते यंदा भ्रष्टाचार विरोधी मोहीम या मारबतीचा विषय होता. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला विरोध करणार्‍या कपिल सिब्बल च्या नावाचा बडग्या तयार करण्यात आला आहे.

close