मुंबईत पावसाच्या संततधार लोकल स्लो ट्रकवर

August 29, 2011 1:17 PM0 commentsViews: 2

29 ऑगस्ट

काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. आज वर्किंग डे असल्याने चाकरमाने कामासाठी घराबाहेर पडले. मात्र पावसामुळे आणि रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांमुळे बहुतेक रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतं. पण यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लोकलचाही दिलासा मिळाला नाही. कारण लोकल्सही काही काळ ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर धीम्या गतीने लोकल्स सुरू झाल्या. पण स्टेशन्सवर भरपूर गर्दी होती. एकूणच पाऊस आणि विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक यामुळे मुंबईकर आज अगदी जेरीला आले होते.

पावसाने रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे मुंबईतली लोकलसेवा काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे कामाची वेळ असल्याने रेल्वे स्टेशन्सवर भरपूर गर्दी होती.11 च्या सुमारास लोकल सुरू झाल्या. मात्र धीम्या गतीने सुरू असलेल्या या वाहतुकीने स्टेशन्सवर चांगलीच गर्दी होती. कामावर जाण्यासाठी मुंबईकरांचे यामुळे चांगलेच हाल झाले.

close