मारूती नवलेंचा जामीन अर्ज फेटाळला

August 29, 2011 1:41 PM0 commentsViews: 4

29 ऑगस्ट

पवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी मारूती नवले आणखी अडचणीत आले आहेत. मारूती नवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आज शिवाजीनगर कोर्टाने नवलेंच्या अर्जावर निर्णय दिला. त्यामुळे नवलेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

पुण्यापासून 25 किलोमीटरवर पिरंगुटजवळच्या सुतारवाडीत पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची शाळा आहे. दिवंगत मुलाच्या स्मृती जपण्यासाठी चैनसुख गांधी यांनी या शाळेच्या माध्यमातून गरीब होतकरू मुलांना शाळा बांधली. यासाठी सिंहगड संस्थेचे सर्वेसर्वा मारूती नवलेंशी त्यांनी 8 मार्च 2008 ते 7 मार्च 2011पर्यंत करार केला. पण करारानुसार नवले अटी पाळत नाहीत आणि त्यांच्या मनात ही जागा बळकावण्याचा डाव असल्याचं गांधीच्या लक्षात आलं. त्यामुळे गांधींनी करार संपल्यावर दुसर्‍या संस्थेला शाळा चालवायला द्यायचं ठरवलं. मात्र नवलेंनी करारावर खाडाकोड केली आणि गांधींच्या सह्यांचा दुरूपयोग करत करार परस्पर वाढवला. इतकच नाही तर मोकळी जागा विकत घेत असल्याचं खरेदी खतही तयार केलं. शेवटी गांधींनी या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

close