अण्णांना तीन दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

August 29, 2011 5:21 PM0 commentsViews: 6

29 ऑगस्ट

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी 12 दिवस उपोषण करून एका ऐतिहासिक लढ्याच्या विजयाची नोंद केली. अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाला संसदेत तत्वत:मान्यता देण्यात आली. या ऐतिहासिक विजयानंतर अण्णांनी आपले उपोषण सोडले. 12 दिवस उपोषण केल्यामुळे अण्णांना खूप अशक्तपणा आला होता. उपोषण संपल्यानंतर अण्णांना थेट गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अण्णांचे या बारा दिवसात सात किलोपर्यंत वजन कमी झाले होते. आता अण्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दोन ते तीन दिवसात अण्णा हजारे यांना डिस्चार्ज मिळेल असं डॉ.नरेश त्रेहान यांनी सांगितले.

close