बाबा रामदेवांच्या आंदोलनावर कारवाई का केली ?; कोर्टात सवाल

August 29, 2011 3:34 PM0 commentsViews: 3

29 ऑगस्ट

रामलीला मैदानात बाबा रामदेव यांच्या आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले. तसेच रामदेव बाबा यांचे उपोषण रद्द करण्याचे आदेश कुणी दिले. असा सवाल सुप्रीम कोर्टाने नेमलेले वकिल राजीव धवन यांनी सुनावणीमध्ये विचारला. बाबा रामदेव यांच्या उपोषणामुळे काय धोका होता असा मुद्दाही धवन यांनी उपस्थित केला.

रामलीला प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यामध्ये राजीव धवन यांनी कोर्टात पोलिसांचे वायरलेस मेसेज वाचून दाखवले. हे मेसेजेस पाच जूनला पाठवण्यात आले होते, असं त्यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राबद्दलही धवन नाराज आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 30 सप्टेंबरला होणार आहे.

close