बाबा रामदेव आणि पंतजली ट्रस्टविरोधात गुन्हा दाखल

September 1, 2011 9:09 AM0 commentsViews: 22

01 सप्टेंबर

योग गुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर परकीय चलन कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. पंतजली योगपीठ आणि दिव्य योग या संस्थेतून इंग्लड आणि न्युझीलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा व्यवहार आढळून आला आहे. जवळपास 7 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. त्याशिवाय स्कॉटलंडमधील खाजगी बेटाबद्दलही ईडीने चौकशी सुरु केली आहे.

close