न्यायमूर्ती सौमित्र सेन यांचा राजीनामा

September 1, 2011 5:22 PM0 commentsViews: 2

01 सप्टेंबर

कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांनी आज पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. लोकसभेत त्यांच्यावर महाभियोग चालणार आहे. त्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 19 ऑगस्टला त्यांना राज्यसभेनं महाभियोग चालवून बडतर्फ केलं होतं. कोर्टाच्या निधीची अफरातफर केल्याचे आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप सेन यांच्यावर आहेत. दरम्यान, सेन यांनी स्वतःहून राजीनामा दिला याचं भाजपनं स्वागत केलं.

राज्यसभेनं कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती सौमित्र सेन यांना बडतर्फ केलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. सेन यांना बडतर्फ करण्यासाठी राज्यसभेत मतदान झालं. सेन यांना हटवण्याच्या बाजूनं 189 मतं पडली तर विरोधात 17 मतं पडली. बहुजन समाज पक्ष वगळता इतर सर्व पक्षांनी सेन दोषी असल्याचं मान्य केलं.

कोर्टाच्या निधीची अफरातफर केल्याचे आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप सेन यांच्यावर आहेत. अखेर सेन यांनी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. सेन यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची घोषणा केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी केली.

सेन यांच्यावर 32 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावरुनच 16 मार्च 2008 रोजी सेन यांना सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांनी राजीनामा देण्याचा सल्ला दिला सौमित्र सेन यांना दिला होता. मात्र त्यांनी त्याला नकार दिला होता. शेवटी सरन्यायाधीशांनी 4 ऑगस्टला सेन यांना बडतर्फ करण्यासाठी पतंप्रधानांना पत्र लिहीलं. हायकोर्टाच्या न्यायाधीशावर महाभियोग चालवण्याची भारतातली ही दुसरी घटना आहे.

close