बाप्पांची मूर्ती घरीच बनवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा

September 2, 2011 10:58 AM0 commentsViews: 12

02 सप्टेंबर

इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्याचा आग्रह दरवर्षी धरला जातो. पुण्यातील बांधकाम व्यावसाईक जवाहर भोई हे गेल्या 19 वर्षांपासून इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करत आहे. विशेष म्हणजे भोई हे आपल्या हाताने गणरायाची मूर्ती तयार करतात. आणि नदी, विहिरीत किंवा समुद्रात गणरायचे विसर्जन करण्यापेक्षा आपल्या घरीच पाण्याच्या टबामध्ये विसर्जन करण्याचा वेगळा उपक्रम राबवत आहे. जवाहर भोई यांनी आयबीएन लोकमतच्या "बाप्पा मोरया रे" या फेसबुक पेजवर आपल्या कार्याची ओळख करून दिली. याबद्दल भोई म्हणतात की, हा उपक्रम करत असताना मानसिक समाधान तर मिळतेच शिवाय पर्यावरणसाठी काही तरी केल्याचे समाधान देखील मिळते. जास्तीत जास्त लोकांनी असा उपक्रम करावा ज्यामुळे एक सामाजिक जागृती होईल असं आवाहन ही भोई यांनी केले.

close