शेहला मसूद हत्येप्रकरणी भाजपच्या खासदारांची चौकशी

September 1, 2011 5:18 PM0 commentsViews: 2

01 सप्टेंबर

आरटीआय कार्यकर्त्या शेहला मेहसूद हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. मेहसूद हत्या प्रकरणात भाजपच्या दोन खासदारांची चौकशी होणार आहे. तरुण विजय आणि अनिल दवे अशी या दोन खासरांची नावं आहेत. मेहसूद यांच्या हत्येच्या काही तासांपूर्वी त्यांचं तरुण विजय यांच्याशी फोनवर तब्बल 45 मिनिटे बोलणं झाल्याचं समोर आलंय. पण शेहला मेहसूद यांच्या हत्येशी आपला संबंध नाही, त्यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध होते असं तरुण विजय यांनी म्हटलं आहे.

close