‘पुढच्या वर्षी लवकर या’

September 2, 2011 4:34 PM0 commentsViews: 21

02 सप्टेंबर

"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या" च्या गजरात आज दीड दिवसाच्या गणपतींचं आज विसर्जन झालं. मुंबईत दादर आणि जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी गर्दी झाली होती. तर पुण्यातही दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षीचा जयघोष इथंही सुरू होता. पुण्यामध्ये सतत सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून जास्त पाणी सोडलं जातं आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे फायरब्रिगेडच्या लाईफगार्ड्सच्या मदतीनं गणेश विसर्जन करावे लागत होते. अनेक विसर्जन हौदसुद्धा पाण्याखाली गेले होते.

close