अरविंद केजरीवाल यांना ठोठावला 9 लाखांचा दंड

September 2, 2011 1:53 PM0 commentsViews: 1

02 सप्टेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं नोटीस पाठवली आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते असलेल्या केजरीवाल यांना 9 लाख रुपये ड्यू भरण्यासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली. रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या एक आठवडा आधी ही नोटीस त्यांना पाठवण्यात आली होती.

केजरीवाल हे अजूनही आआरएस म्हणजे इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आहेत. कारण त्यांनी 2006 मध्ये दिलेला राजीनामा अजूनही डिपार्टमेंटनं स्वीकारलेला नाही. आयटी डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार केजरीवाल यांनी सर्व्हिस बॉन्डमधिल अटींचा भंग केला. त्यामुळे त्यांना 9 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. 9 लाख रुपये भरल्याशिवाय त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही. हे आयटी डिपार्टमेंटकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपअरविंद केजरीवाल यांनी केला.

close