आजच्या वन डेतून सचिनची माघार ; अजिंक्य,राहुल आऊट

September 3, 2011 10:06 AM0 commentsViews: 2

03 सप्टेंबर

मॅचेंस्टर वनडेमध्ये टॉस जिंकून इंग्लंडने बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पहिली बॅटिंगची संधी मिळाली असली तरी भारताला एक धक्का बसला आहे. पायाच्या दुखण्यामुळे मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरनं माघार घेतली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला संधी मिळाली आहे. मात्र चांगल्या सुरूवातीनंतर भारताला दोन धक्के बसले आहेत.

पहिलीच वन डे मॅच खेळणारा अजिंक्य रहाणे 40 रन्स तर राहुल द्रविड 2 रन्स करून आऊट झाला आहे. रहाणे आणि पटेलनं पहिल्या विकेटसाठी 82 रन्सची पार्टनरशिप केली. खराब फटका मारत रहाणे कॅच आऊट झाला. पायाच्या दुखापतीमुळे सचिन तेंडुलकर या मॅचमध्ये खेळत नाही. त्याच्याऐवजी रहाणेला संधी देण्यात आली. पार्थिव पटेलनं शानदार हाफसेंच्युरी केली आहे.

टेस्ट सीरिजमध्ये आणि टी-20 मॅचमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय टीम हे अपयश धुवून टाकायला सज्ज झाली. वर्ल्डकप जिंकल्यामुळे भारतीय टीम अर्थातच वन डेमध्ये चॅम्पियन आहे. पण या टीमच्या मागे दुखापतीचं शुक्लकाष्ठ लागलंय.

टीममध्ये वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, झहीर खान, इशांत शर्मा आणि हरभजन सिंग दुखापतीनं त्रस्त आहेत. आणि त्यामुळे ते वन डे सीरिजमध्ये खेळू शकणार नाहीत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून मोठी अपेक्षा होती. मात्र ऐणी वेळी सचिनला पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

तर दुसरीकडे अवघ्या दोन वर्षांनंतर वन डेमध्ये पुनरागमन करणारा राहुल द्रविडही सज्ज झाला आहे. तर टेस्ट आणि टी-20 मध्ये इंग्लंडने विजय मिळवलाच आहे पण त्याचबरोबर कॅप्टन ऍलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली या टीमनं श्रीलंकेविरूद्धची वन डे सीरिजही जिंकली. त्यामुळे टीमचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. इंग्लंडचा बॅट्समन केव्हीन पीटरसनला या सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे.

close