मुंबई विमानतळावर विमान घसरले

September 2, 2011 10:06 AM0 commentsViews: 4

02 सप्टेंबर

मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. तुर्कस्थानच्या एअरवेजचं विमान धावपट्टीवरुन घसरलं. पण यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे 4.13 वाजता ही घटना घडली. या विमानात 97 प्रवासी होते. पण सध्या सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या अपघातानंतर मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. तर डीजीसीए (DGCA) नं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या अपघातानंतर दुसर्‍या धावपट्टीवरुन विमानाचं उड्डाण होतं. त्यामुळे सर्व विमानं 15 ते 30 मिनीटे उशीराने उडत आहे.

close