मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तपासाधिकार्‍यांना धमक्या

November 16, 2008 5:09 AM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबरएटीएसचे जॉइंट सीपी हेमंत करकरे, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले सरकारी वकील अजय मिसर आणि याप्रकरणातील तपास अधिकारी मोहन कुलकर्णी या तिघांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 699132 या क्रमाकावरून हा धमकीचा फोन सरकारी वकील अजय मिसर यांना आला होता. त्यानंतर त्याचा तपास केला असता, तो एका पीसीओवरून केला गेला असल्याचं उघड झालंय. आता हा फोन कुणी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

close