कोकण,पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे थैमान

September 3, 2011 10:34 AM0 commentsViews: 19

03 सप्टेंबर

मागिल आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपले आहे. पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. सिंहगड रोड परिसर, विठ्ठलवाडी, वारजे, येरवडा, खराडी, डेक्कन जिमखाना पुलाची वाडी, पुणे महापालिकेसमोरचा भाग, पाटील इस्टेट, हडपसर, मुंढवा या भागातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. तर शहरातला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. शहरातील रस्तेही जलमय झाले आहेत. पुणे जिल्ह्यातली जवळपास सगळी धरणं 100 टक्के भरली आहे.कोकणात पावसाचा जोर कायमकोकणातही पावसाचा जोर कायम आहे. दाभोळ खाडीत गणेश भक्तांची गाडी बुडाली. यात पाचजणांना वाचवण्यात यश मिळाले आहे तर एकाचा मृत्यू झाला. रत्नागिरीत वशिष्टी, जगबुडी नद्यांना पूर आला आहे. खेड बाजार पेठेत पाणी भरलंय. तर खेड दापोली मार्गावर दोन फुट पाणी भरलंय. तसेच चिपळूनमध्येसुद्धा धोक्याचा इशारा देण्यात आला. सिंधुदुर्गातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सुख नदीला पूर आला. तर खारेपाटण एसटी स्टँड पाण्याखाली गेला. सिंधुदुर्गातल्या काही छोट्या पुलांवरही पाणी आलंय. काही वसाहतींमध्येही पाणी शिरले आहे.

सातार्‍यात संततधार सुरूच

सातारा जिल्ह्यात संततधार सुरूच आहे. कोयना धरणाचे दरवाजे 16 फुटानं उघडले. नदी पात्रात पाणी सोडण्यात येतं आहे. पाटण तालुक्यातील सगळे पुल पाण्याखाली गेले आहेत. पाटण तालुका पाणी आणखी सोडण्याची शक्यता आहे. तसेच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व दरवाजे 13 फुटानं उघडले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं कोयना नदीपात्राजवळील गावांना हायअलर्ट दिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. परिसरातल्या बिरमणी, हातलोट, बिरवाडी, दुधगाव आणि पार या गावांचा संपर्क तुटला आहे.

close