पद्मसिंह पाटलांच्या वचर्स्वाला धक्का; जिल्हा बँकेवर काँग्रेसचा झेंडा

September 3, 2011 10:48 AM0 commentsViews: 1

03 सप्टेंबर

माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबादमधील वर्चस्वाला धक्का बसला आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी काँग्रेसचे बापुराव पाटील विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी नारायण समुद्र यांची निवड झाली आहे. गेली अनेक वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पद्मसिंह पाटील यांचं वर्चस्व होतं. काही वर्षांपूर्वी या बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ही बँक चर्चेत आली होती.

close