भारतीय क्रिकेटपटू ‘गाढव’ – नासीर हुसेन

September 2, 2011 10:46 AM0 commentsViews: 1

02 सप्टेंबर

इंग्लंडचा माजी कॅप्टन नासीर हुसेन यानं पुन्हा एकदा भारतीय टीमबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नासिर हुसेननं भारतीय खेळाडूंना चक्क गाढव म्हटलं आहे. भारतीय टीममध्ये तीन ते चार चांगले फिल्डर्स आहेत. पण एक ते दोन गाढवसुध्दा असल्याचं नासिर हुसेननं म्हटलं आहे. बुधवारी झालेल्या टी-20 मॅचमध्ये कॉमेंट्री करताना चौथ्या ओव्हर दरम्यान हुसैननं हे वादग्रस्त विधान केलं. त्याचा सहकारी कॉमेंटेटर हर्षा भोगलेनं मात्र या वक्तव्याबद्दल मौन बाळगणंच पसंद केलं. पण याचे पडसाद आता उमटू लागले आहे. भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

close