गुजरातमध्ये लोकायुक्त नियुक्तीवरून भाजपची राष्ट्रपतींकडे धाव

September 2, 2011 11:32 AM0 commentsViews: 2

02 सप्टेंबर

गुजरातमधील लोकायुक्तांच्या निवडीवरुन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एकदा जुंपली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपाल डॉ. कमला बेनीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. गुजरातच्या राज्यपाल बेनीवाल यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता राज्यात आर ए मेहता यांची लोकायुक्त पदी निवड केली.

असा आरोप भाजपकडून केला जातोय. मंगळवारी भाजपच्या खासदारांनी संसदेत या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारला. त्याचबरोबर केंद्र सरकार राज्यपालांच्या आडून राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करतंय असा आरोपही भाजपकडून केला जातोय. भापचे वरीष्ठ नेते आज या संदर्भात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दरम्यान, या प्रकरणावरुन विरोधकांचा दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ केल्यानं दोन्ही सभागृह काळी वेळासाठी तहकूब करण्यात आली.

close