ज्येष्ठ समाजवादी नेते शांताराम गरुड यांचं निधन

September 3, 2011 1:03 PM0 commentsViews: 5

03 सप्टेंबर

समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष कॉम्रेड शांताराम गरुड यांचं आज इचलकरंजीमध्ये निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. गेली सत्तर वर्ष सार्वजनिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्‍या गरुड यांच्या निधनामुळे समाजवादी प्रबोधिनीसारख्या अनेक सामाजिक संस्थांची मोठी हानी झाली. वयाच्या तेराव्या वर्षी सातार्‍याच्या क्रांतीकारी चळवळीत ते सहभागी झाले होते. क्रांतीसिंह नाना पाटील यांचे ते जवळचे सहकारी होते.

1951 मध्ये कम्युनिस्ट पक्षात सामील झाल्यानंतर 77 पर्यंत कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व आंदोलनांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 1964 मध्ये ते सीपीएमध्ये सामील झाले. तीन वेळा त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला. त्यानंतर 1977 मध्ये समाजवादी प्रबोधिनी शास्त्रीय समाजवादाचं खुलं ज्ञानपीठ त्यांनी प्राध्यापक डॉ.एन.डी.पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नार्वेकर गुरूजी यांच्या मदतीनं सुरू केलं. 34 वर्षात प्रबोधिनीला विकसीत केलं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र फाऊंडेशनचा प्रबोधनाचा पुरस्कार, क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार असे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

close