भारताचे 275 धावांचे आव्हान ; द्रविडचा हकनाक बळी

September 3, 2011 2:08 PM0 commentsViews: 2

03 सप्टेंबर

अंपायर रिव्ह्यू सिस्टिम अर्थात युडीआरएस वर पुन्हा पुन्हा सवाल उभे राहत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये राहुल द्रविड तिसर्‍यांदा या प्रणालीचा बळी ठरला. आणि याही वेळी तो नक्की आऊट होता का यावर दुमत आहे. स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर विकेटकीपर किसवेटरने कॅचचं अपील केलं. ऑनफिल्ड अंपायरनी त्याला आऊट दिलं नाही. पण इंग्लंडच्या टीमने निर्णयाविरुद्ध अपील केलं. हॉक आय तंत्रज्ञान वापरुन मिळालेल्या फुटेजमध्येही त्याच्या बॅटला बॉल लागल्याचं दिसत नव्हतं. पण आवाज मात्र आला. आणि तिसर्‍या अंपायरनी द्रविडला आऊट दिलं. दरम्यान पहिल्या वन डेमध्ये भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 275 रनचं टाग्रेट ठेवलंय. पार्थिव पटेलने भारतातर्फे सर्वाधिक 95 रन केले.

close