मुंबई गोवा महामार्ग 2 दिवस राहणार ठप्प

September 4, 2011 1:21 PM0 commentsViews: 2

04 सप्टेंबर

ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वे बंद असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. रेल्वे पूर्व पदावर येत असतानाच आता हायवेही बंद झाला आहेत. मुंबई गोवा महामार्ग तब्बल दोन दिवस बंद राहणार असल्याचे साबाविच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीमधील कशेडी घाटात दोन वेळा मोठी दरड कोसळल्यामुळे हायवेचा अर्धा भाग दरीत खचला आहेत. आज पहाटे 4 वाजता पहिली दरड कोसळली ती बाजुला करण्यात तब्बल 9 तास लागले. त्यानंतर पुन्हा 4 वाजता त्याच ठिकाणी दुसर्‍यांदा दरड कोसळली दरड खूप मोठी असल्यामुळे वेळ लागणार आहे. शिवाय हायवे खचल्याने तो पुन्हा वाहतुकीस खुला करण्यास दोन दिवस लागतील. दरम्यान हायवेवरची वाहतूक कोल्हापूर मार्गे एनएच 4 वरून वळवण्यात आली.

close